IPL 2020 Live Cricket :RR vs CSK स्टीव्ह स्मिथच्या वापसीमुळे राजस्थान रॉयल्सला दिलासा | iGaming insider
           
               
GET FREE 99 BONUS

AND LIVE CRICKET SCORE


               

Breaking News

IPL 2020 Live Cricket :RR vs CSK स्टीव्ह स्मिथच्या वापसीमुळे राजस्थान रॉयल्सला दिलासा

IPL 2020 Live Cricket Score

शारजाहमध्ये आज राजस्थान आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये सामना रंगणार आहे. परंतु, राजस्थान रॉयल्सच्या संघाला आयपीएलमधील पहिल्या सामन्याआधीच अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.

RR vs CSK स्टीव्ह स्मिथच्या वापसीमुळे राजस्थान रॉयल्सला दिलासा

इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीझनचा चौथा सामना आज (मंगळवार) चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये रंगणार आहे. राजस्थान रॉयल्सच्या संघाला आयपीएलमधील पहिल्या सामन्याआधीच अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. संघातील स्टार खेळाडू जॉस बटलर पहिला सामना खेळू शकणार नाही. तसेच ऑलराउंडर बेन स्टोक्सही आयपीएलच्या 13व्या सीझनच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. तसेच राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार स्टीव स्मिथही पहिला सामना खेळू शकणार नाही, असं म्हटलं जात होतं. परंतु, स्टिव्ह स्मिथ खेळण्यासाठी फिट असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे स्मिथच्या वापसीमुळे संघाला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

 

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव स्मिथला इंग्लंडच्या दौऱ्यावर मॅनचेस्टरमध्ये नेट प्रॅक्टिस करताना दुखापत झाली होती. त्यामुळे स्मिथ चीन वनडे मॅचमध्ये सहभागी होऊ शकला नव्हता. तसेच याच कारणामुळे स्मिथ आयपीएलमध्ये होणाऱ्या राजस्थानच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही, असं सांगण्यात येत होतं. परंतु, आता स्मिथ आजच्या सामन्यात मैदानावर उतरणार असल्यामुळे राजस्थान रॉयल्सला मोठा दिलासा मिळाला आहे.

 

गेल्या सीझनमध्ये राजस्थान रॉयल्सने शेवटच्या 6 सामन्यांमध्ये अजिंक्य रहाणेकडून कर्णधार पदाची धुरा स्टीव स्मिथकडे दिलं होतं. स्मिथ कर्णधार असताना राजस्थानने शेवटच्या 6 सामन्यांपैकी 5 सामने जिंकले होते. आज सीएसके विरूद्ध रंगणाऱ्या सामन्यात स्मिथ व्यतिरिक्त मिलर, आर्चर आणि टॉम कुरेल यांना संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

 

बटलर क्वॉरंटाइन

 

शारजाहमध्ये 22 सप्टेंबर रोजी राजस्थान आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये सामना रंगणार आहे. इंग्लंडचा स्टार खेळाजू जोस बटलरने रविवारी खुलासा केला की, तो यूएईमध्ये क्वॉरंटाईन असल्यामुळे पहिला सामना खेळू शकणार नाही.

 

राजस्थान रॉयल्सने सोशल नेटवर्किंग साइट इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये बटलर असून तो म्हणाला की, ‘मी क्वॉरंटाईन असल्यामुळे दुर्दैवाने राजस्थान रॉयल्ससाठी पहिला सामना खेळू शकणार नाही. मी इथे माझ्या कुटुंबासोबत आहे. ही चांगली गोष्ट आहे की, राजस्थान रॉयल्स संघाच्या वतीने मला माझ्या कुटुंबाला येथे घेऊन येण्याची परवानगी दिली. माझ्यासाठी ही खूप मोठी मदत आहे.’

 

बेन स्टोक्स वडिलांच्या आजारपणामुळे आजच्या सामन्यात गैरहजर

 

स्टार ऑलराउंडर बेन स्टोक्सही चेन्नई सुपर किंग्सच्या विरूद्ध होणाऱ्या सामन्यात खेळू शकणार नाही. स्टोक्सच्या वडिलांना ब्रेन कॅन्सरचं निदान झालं आहे. त्यामुळे बेन स्टोक्स आपल्या कुटुंबासोबत क्राइस्टचर्चमध्ये आहे. स्टोक्स ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या वनडे आणि टी-20 सामन्यांमध्येही सहभागी झाला नव्हता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *